तुर्भे प्रभाग क्र.२० मध्ये शिवसेनेच्या प्रचार सभांचा धडाका...
सुरेश कुलकर्णी यांच्या विकासाच्या संकल्पांना मिळतोय जबरदस्त प्रतिसाद
नवी मुंबई (प्रतिनिधी) - तुर्भे स्टोअर प्रभाग क्र.२० येथील के.के.आर. रोड परिसरातील माता दुर्गा मंदिर येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख व माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी व युवा बेलापूर विधानसभा अध्यक्ष महेश सुरेश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुक- २०२६ च्या प्रचार व जनसंवाद सभा आयोजित करण्यात येत असून या प्रचारसभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या प्रचारसभेत सर्व धर्मीय नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश कुलकर्णी यांनी नागरिकांना आगामी महापालिका निवडणुक- २०२६ साठी सज्ञ राहण्यास सांगत आगामी निवडणूक ४ सदस्य प्रभाग रचना पद्धतीने होणार असल्याने सर्व नागरिकांना ४ ची प्रभाग रचना पद्धत समजावून सांगत यापुढील काळात नवचैतन्यांनी या निवडणुकीला सामोरे जात सर्वांना एकजूट राहत काम करण्या संबंधित आवाहन केले. शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना शिवसेना चिन्हा समोरील बटन दाबून मोठया मताधिक्यांनी निवडून देण्या संबंधित संबोधित केले.
याप्रसंगी परिसरातील मोठ्या संख्येने महिला -युवक -युवती नागरिक समवेत मा.नगरसेविका संगीता वास्के, मुद्रिका गवळी, मा.नगरसेवक प्रल्हाद शेल्हाळकर, युवती नेतृत्व अबोली महेश कुलकर्णी, उपशहर प्रमुख कचरू वाघमारे, तय्यब पटेल, विनोद मुके, समाजसेवक अनिल पाटील, देविदास लगाडे, वसंत वास्के, फकीरा पॅथरचे संस्थापक अध्यक्ष अँड.गुरु सूर्यवंशी, विभाग प्रमुख दीपेश शिंदे, संदीप वाघ, युवा समाजसेवक संजय कांबळे, श्रीमंत बगळे, तसेच शिवसेना-युवासेना -युवतीसेना, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...
