२७ गावांतील नागरिकांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली; स्वतंत्र महापालिकेच्या मागणीला सरकारचा प्रतिसाद नाही!
२७ गावांतील नागरिकांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली; स्वतंत्र महापालिकेच्या मागणीला सरकारचा प्रतिसाद नाही!
केडीएमसी निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे आवाहन
कल्याण (वार्ताहर) - २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी ही मागणी सरकारकडे लावून धरली होती. मात्र सरकारने आमच्या मागणीचा विचार केला नाही. २७ गावातील नागरीकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे सर्व पक्षीय राजकीय नेते पदाधिकारर यांनी आणि इच्छूक उमेदवारांनी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीवर बहिष्कार घालावा असे आवाहन सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने केले आहे. निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली तर समिती त्यांच्या विरोधात सक्रीय भूमिका घेणार असल्याचा इशारा यावेळी समितीचे पदाधिकारी सुमित वझे यांनी दिला आहे. या संदर्भात गुरुवारी सायंकाळी समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्वाची बैठक कल्याण ग्रामीणमधील काटई येथे पार पडली. या बैठकीत समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
समितीचे पदाधिकारी सुमित वझे यांनी सांगितले की, सरकारची भूमिका २७ गावातील नागरीक,भूमीपूत्र आणि पाच सागरी जिल्ह्याबाबत उदानीस आहे. सरकारने नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळले नाही. त्याचबरोबर लोकनेते दि. बा. पाटील यांचे स्वप्न होते की, २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी. या मागणीसाठी खा. सुरेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने राज्य सरकारकडे २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी केली. त्याला सरकारने प्रतिसाद दिला नाही. आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छूक उमेदवारांनी केडीएमसी निवडणूकीवर बहिष्कार टाकावा असे समितीने आवाहन केले आहे.
जर कोणी उमेदवार उभा केल्यास समिती प्रतिउत्तर देणार
दरम्यान, समितीच्या निर्णयाविरोधात जाऊन जो कोणी निवडणूकीत उमेदवार उभे करेल त्याला समिती सक्रीय सहभाग घेऊन प्रतिउत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. समितीने हा निर्णय घेतल्याने १३,१६,१७,१९,३०,३१ या सहा पॅनलवर परिमाण होणार आहे.
Most Popular News of this Week
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
