नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक कामासाठी हजर न होणा-या 79 कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक कामासाठी हजर न होणा-या 79 कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ही दि.15 जानेवारी 2026 रोजी होत असून निवडणूकीच्या कामकाजाकरीता विविध प्रधिकरणांच्या अधिकारी, कर्मचारीवृंदाची नेमणूक करण्यात आलेली आहे. एकूण 28 प्रभागांमध्ये 111 सदस्य संख्येकरिता 1151 मतदान केंद्रे असून निवडणूकीच्या विविध कामांसाठी कर्मचा-यांना नेमणूक पत्रे देण्यात आलेली आहेत. तथापी या नेमणूक पत्रानुसार निवडणूक कामकाजाकरिता हजर न झालेल्या 79 अधिकारी, कर्मचारी यांना नोटीस बजावण्यात आली असून नोटीस मिळताच 24 तासाच्या आत नेमणूकीच्या ठिकाणी हजर व्हावे अन्यथा पोलीस स्टेशनमध्ये आपल्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात येईल अशी स्पष्ट सूचना नोटीसेव्दारे देण्यात आलेली आहे.
निवडणूकीचे कामकाज हे कालमर्यादित व विहित वेळेत करावयाचे असल्याने सदर कामात अडथळा निर्माण होत असल्याचे लक्षात घेउुन निवडणूक कामात टाळाटाळ, हजगर्जीपणा व दिरंगाई करीत असल्याचे लक्षात घेउुन नोटीस मिळताच 24 तासाच्या आत नेमणूकीच्या ठिकाणी हजर व्हावे असे स्पष्ट निर्देशित करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सर्वच बाबींची काटेकोर अंमलबजावणी करीत असून याचाच एक भाग म्हणून आवश्यक मनुष्यबळ उपलब्धतेच्या दृष्टीने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.
Most Popular News of this Week
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
११ जणांच्या मृत्यूनंतर...
कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...
नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...
| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...
खारघरमध्ये डेब्रीज खाली...
खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...
