तळोजा एमआयडीसीतील लॉजवरील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; एका बांग्लादेशी मुलीसह सहा महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका
तळोजा एमआयडीसीतील लॉजवरील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; एका बांग्लादेशी मुलीसह सहा महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई गुन्हेशाखेने शहरातील वेश्या व्यवसायावर कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्यातच तळोजा एम.आय.डी.सी येथील हॉटेल नवनाथ इन या लॉजवर नवी मुंबई गुन्हेशाखेच्या पथकाने धाड टाकून सदरठिकाणी चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सदरठिकाणाहून वेश्याव्यवसायातुन एका बांगलादेशी अल्पवयीन पिडीत मुलीसह ६ पिडीत महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी सुटका केली आहे. सुटका केलेल्या सहा महिलांमध्ये दोन बांग्लादेशी महिलांचा समावेश आहे.
नवी मुंबईतील अनैतिक व्यवसायावर कारवाईचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत, तळोजा एम.आय.डी.सी. येथील हॉटेल नवनाथ इन या लॉजिंगचा मॅनेजर हा लॉजमध्ये ग्राहकाकडुन २ हजार रूपये घेवुन लॉजमधील रूममध्ये ठेवलेल्या महिला दाखवुन, त्या महिलांकडुन वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पथकाने सदर लॉजवर छापा टाकला असता, त्याठिकाणी वेश्या व्यवसायासाठी ठेवलेल्या एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीसह ६ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. यात दोन बांग्लादेशी महिलांचा समावेश आहे.
याप्रकरणात लॉज मालक वसंत गणेश शेट्टी यांच्यासह मॅनेजर गिरीश शेट्टी, सर्व्हिस बॉय रोशन रामजित यादव या तिघांनी आपसात संगनमत करून एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीसह 0६ महिलांना वेश्या व्यवसायाकरीता प्राप्त करून नमुद लॉजचा वेश्याव्यवसायासाठी वापर केल्याने उपरोक्त तिघा जणांविरोधात भा. न्या.सं. कलम १४३ (३), १४३ (४), ३(५), सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम १९५६ कलम ३. ४, ५, सह पोस्को कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करत आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनिरी पृथ्वीराज घोरपडे, पोलिस हवालदार मांडोळे, ठाकुर, चव्हाण, पोशि पारासुर, कोलते, सविता म्हात्रे, मनिषा पावडे, हांडे आदींच्या पथकाने सदरची ही कारवाई पार पाडली.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...
