नवी मुंबई विमानतळावरून उद्यापासून पहिली विमानसेवा!
सिडकोचे सर्वात महत्त्वाकांक्षी स्वप्न साकार...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) या देशातील अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळाच्या यशस्वी उभारणीने भारताच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात एक सुवर्णाक्षरांनी लिहावा असा अध्याय जोडला गेला आहे. सिडकोची टूरदृष्टी, चिकाटी आणि सक्षम अंमलबजावणीचे हे भव्य प्रतीक असून, गुरुवार दि. २५ डिसेंबर २०२५ पासून येथून पहिली विमानसेवा सुरू होत आहे. हा नवी मुंबई, महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. या ऐतिहासिक प्रसंगी बोलताना सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालनास प्रारंभ होणे हे महाराष्ट्र शासन व सिडकोची पायाभूत सुविधा विकासाबाबतची सातत्यपूर्ण बांधिलकी अधोरेखित करते. हा प्रकल्प सिडकोच्या बांधिलकीची हमी देत असून भविष्योन्मुख पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास आणि जागतिक स्तरावरील कनेक्टिव्हिटीसाठी आमची कटिबद्धता अधोरेखित करतो. या प्रवासात विधास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे हे सामूहिक यश असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकल्पामध्ये नियोजनापासून प्रत्यक्ष कार्यान्वयनापर्यंत अनेक दशकांचा प्रवास असलेल्या या प्रकल्पामध्ये अत्यंत काटेकोर नियोजन, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळतो. नवी मुंबई आंतरराष्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतु्कीवरील ताण कमी होणार असून, नियोजित मल्टी-एअरपोर्ट प्रणाली अधिक सक्षम होणार आहे. या ऐतिहासिक टप्प्याबद्दल नागरिकांचे अभिनंदन करताना सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, यांनी नवी मुंबईकरांसह महाराष्रातील आणि देशभरातील नागरिकांना शुभेच्छाही दिल्या. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रत्यक्ष उड्डाण हे जनतेच्या दीर्घकाळच्या स्वप्नाची पूर्तता असल्याचे त्यांनी नमूद केले.
सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कमळाकृती संकल्पनेवर आधारित अत्यंत आकर्षक टर्मिनल रचनेसाठी अदानी समूह, तसेच एनएमआयएएल यांचे मनःपूर्वक आभार नोंदविले आहेत. ही भव्य रचना आता विमानतळाची एक प्रभावी वास्तुशिल्पीय ओळख बनली असून, भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडविण्यासोबतच शाश्वत विकास, नवोन्मेष आणि जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रतीक ठरते. महाराष्ट्र शासनाने सिडकोसोबत मिळून या ऐतिहासिक प्रकल्पासाठी आवश्यक ठरलेल्या उत्कृष्ट समन्वय आणि सामायिक टूरदृष्टीची दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासन, सिडको, अदानी समूह आणि एनएमआयएल यांच्यातील सुरळीत व प्रभावी समन्वयामुळे आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिक विमानतळ पायाभूत सुविधांचा एक मानदंड ठरला असून, महाराष्ट्र व देशासाठी अभिमानास्पद नवे प्रवेशद्रार म्हणून उभा राहिला आहे.
विमानतळ कार्यान्वित झाल्याने नवी मुंबईतील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुलभ होणार आहे. तसेच पुणे, ठाणे, पनवेल, रायगड तसेच कोकणातील इतर भागांतील नागरिकांनाही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी मोठा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती, पर्यटनवृद्धी आणि औद्योगिक व व्यापारी गुंतवणुकीला देखील चालना मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी ही या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. महामार्ग, द्रुतगती मार्ग, उपनगरीय रेल्वे, मेत्रे मार्गिका तसेच प्रस्तावित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे विमानतळाकडे विविध दिशांनी सहज व सुरळीत पोहोचणे शक्य होणार आहे. मुंबई त्रन्स हार्बर लिंक (एमटीएचएल) सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. अत्याधुनिक सुविधा, पर्यावरणपूरक रचना आणि भविष्यातील वाढ लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राला नवे परिमाण देत, देशाचे नवे प्रवेशद्वार म्हणून उदयास येणार आहे.
अशी असेल पहिल्या दिवशी प्रथम विमानसेवा...
नवी मुंबई आंतरराष््रैय विमानतळावरून एकूण विमान संचालन - पहिल्या दिवशी एकूण ३० एअर ट्रॅफिक मूव्हमेंठ्त आहे. यात इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर व स्टार एअर या कंपन्या विमानसेवा देणार आहेत. महत्त्वाच्या उड्डाण वेळा: पहिले आगमन: ६ए ४६० - बेंगळुरू येथून - सकाळी 0८.०० वाजता, पहिले प्रस्थान. ६ए ८८२ - हैदराबादकडे - सकाळी 0८.४० वाजता.
