Breaking News

नवी मुंबई काँग्रेसची धुरा आता रामचंद्र दळवींवर!

नवी मुंबई काँग्रेसची धुरा आता रामचंद्र दळवींवर!

पुनम पाटील यांच्या जागी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या सत्ता समीकरणात काँग्रेसला दुर्लक्षित करून कोणालाही सत्तेवर येता येणार नाही. आजही काँग्रेस पक्षाचे संघटन इथं मजबूत असून महाविकास आघाडीतील सहकार्यासह प्रहार आणि वंचित पक्षाना सोबत घेऊन आगामी निवडणुकीस सामोरे जाऊ. स्थानिक पातळीवर निवडणुकीचे निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी आम्हास दिले असल्याचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष रामचंद्र (आबा) दळवी यांनी काल बेलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने आगामी नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने माजी परिवहन समिती सभापती रामचंद्र दळवी यांची जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. त्या अनुषंगाने पक्षाची भूमिका सांगण्यासाठी बेलापूर येथील एलोरा कॅसलं सोसायटीत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती मुख्य समन्व्यक संतोष शेट्टी, नवी मुंबई प्रभारी डॉ. मोनिका अग्रवाल, वरिष्ठ नेते रविंद्र सावंत, नवी मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा उज्वला साळवे, दत्ता माने, प्रा. रत्नाकर कुदळे, रमेश मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना समन्वयक संतोष शेट्टी यांनी सांगितले की, मागील सत्ताधारी राजकारण्यांनी नवी मुंबई महापालिकेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.नागरिकांना आरोग्य सेवा अपुरी मिळत आहे. फेरीवाले, झोपडपट्टी, बेरोजगार आदी च्या समस्या जैसे थे असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिका मुख्यालयासाठी एमजीएम हॉस्पिटल सानपाडा येथील भुखंड मिळत असताना घेतला नाही आणि इथे बेलापूर खाडीतील भुखंड मुख्यालयासाठी घेतला. तुर्भ्यातील कांग्रेस नेते डी.आर. पाटील यांच्या प्रभावाच्या भितीने वाशी, सानपाड्यातील भुखंड नाकारल्याची टिकाही संतोष शेट्टी यांनी केली.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...