घणसोलीतील मदनकुंज अपार्टमेंटच्या अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई
घणसोलीतील मदनकुंज अपार्टमेंटच्या अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई
नवी मुंबई (प्रतिनिधी)- सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागाने शहरातील अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यानुसार काल सिडकोच्या अनधिकृत बांधकामे (उत्तर -२) विभागामार्फत घणसोली नोड से-१६, सर्व्हे नं-५८ येथील मदनकुंज अपार्टमेंटच्या आरसीसी जी प्लस ३ अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर कारवाई करून सदरठिकाणचे १७ स्लॅब्स, ०५ ओटले व ०२ लाईन्स तोडण्यात आले.
दरम्यान, कारवाई करण्यापूर्वी मदनकुंज अपार्टमेंटचे अध्यक्ष व सचिव यांना अनधिकृत बांधकामप्रकरणी सिडकोतर्फे नोटीस बजावण्यात आली होती अशी माहिती सिडको अधिकाऱ्यांनी दिली.सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार नियंत्रक अनधिकृत बांधकामे (उत्तर-२) यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सिडकोच्या अनधिकृत बांधकामे विभागाच्या आरेखक, भूमापकांनी सदर सर्व्हेक्षण स्थळाची पाहणी केली असता, नवी मुंबई प्रकल्पाकरिता अधिसुचित, संपादित जमीन, आरेखित भूखंडावर सिडकोची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे तसेच सदर इमारतीच्या ठिकाणी तळमजला, पहिला मजला व दुसऱ्या मजल्यावर रहिवाशी वापर सुरु असण्यासह तिसऱ्या मजल्याचे काम चालु असल्याचे निदर्शनास आले होते व त्यानुसार सदर इमारतीच्या अध्यक्ष/ सचिव यांना सिडकोतर्फे नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यानंतरही सदरठिकाणी तिसऱ्या मजल्याचे काम सुरु असल्याने काल अखेरीस या इमारतीवर कारवाई करण्यात आली.
Most Popular News of this Week
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
११ जणांच्या मृत्यूनंतर...
कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...
नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...
| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...
खारघरमध्ये डेब्रीज खाली...
खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...
