Breaking News

ठाणे मनपातर्फे शहरातील अनधिकृत बॅनर्ससह पोस्टर्सवर धडक कारवाई

ठाणे मनपातर्फे शहरातील अनधिकृत बॅनर्ससह पोस्टर्सवर धडक कारवाई

ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत जाहिराती, बॅनर्स व पोस्टर्स हटविण्याची मोहीम ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सुरू आहे. मंगळवार दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०0 वाजल्यापासून आचारसंहिता लागू झाल्यानंतर दि.१६ डिसेंबर २०२५ पर्यंत शहरातील एकूण १४०४ अनधिकृत पोस्टर्स व बॅनर्स हटविण्यात आले आहेत.

दि. १५ डिसेंबर ते दि. १६ डिसेंबर २०२५ या २४ तासा दरम्यान ठाणे महापालिकेने एकूण १४०४ अनधिकृत पोस्टर्सवर केलेल्या कारवाईत प्रामुख्याने नौपाडा-कोपरी प्रभाग समिती - २०४, वागळे प्रभाग समिती - २५७, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती - २५७, वर्तकनगर प्रभाग समिती - २७५, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती - १०७,उथळसर प्रभाग समिती- १६९, कळवा प्रभाग समिती- २१, मुंब्रा प्रभाग समिती- १५ व दिवा प्रभाग समिती - ९९ पोस्टर्स यांचा  समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार दि.१५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, त्या पार्थभूमीवर शहरात लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांच्या सूचनेनुसार सहायक आयुक्त सोपान भाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समित्यांमधील पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत अनधिकृत बॅनर्स, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होडिंग्ज, भित्तीपत्रके व पोस्टर्स हटविण्याची कारवाई करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींची नावे असलेल्या विकासकामांच्या कोनशीला झाकण्याची कार्यवाही महापालिकेच्यावतीने करण्यात आली.


Most Popular News of this Week