लॉजिस्टिक पार्क जांभुळपाडा येथील अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई

लॉजिस्टिक पार्क जांभुळपाडा येथील अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई

५२६७७.०० चौ.मी.जागेवरील अनधिकृत बांधकामे तोडली

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागाने शहरातील अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यानुसार काल सिडकोच्या अनधिकृत बांधकामे (न.मुं) विभागामार्फत रोजी नोड लॉजिस्टिक पार्क मौजे जांभूळपाडा सर्वे नंबर २१, २३, २४, २५, २६, ३३ व ६० येथे निष्कासन मोहिम राबवून सिडको अधिसूचित, संपादित जागेवरील अंदाजे क्षेत्रफळ ५२६७७.०० चौ. मी. जागेवरील कंटेनर कार्यालय, कंटेनर, पत्राशेड, पत्रा फेन्स इत्यादी स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम पोकलेन व जेसीबीच्या साहाय्याने तोडले. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहे.

नमूद अतिक्रमण सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन व सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आले असल्यामुळे निष्कासित करण्यात आले असल्याची माहिती सिडकोने दिली. सदरची कारवाईची ही मोहीम सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार व मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी व सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे राबविण्यात आली. या कारवाईसाठी १० लेबर , 0१ जेसीबी, 0१ पोकलेन, 0१ ट्रक, ०१ जीप असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता.


Most Popular News of this Week

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...

११ जणांच्या मृत्यूनंतर...

कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...

नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...

| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...

खारघरमध्ये डेब्रीज खाली...

खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...