“सनबर्न फेस्टिवल" विरोधात वाशीत आंदोलन...
युवकांना अंमली पदार्थांच्या गर्तेत ढकलणारा “सनबर्न फेस्टिवल” रद्द करण्याची मागणी
वाशी (प्रतिनिधी)- नेहमीच वादग्रस्त राहिलेला *सनबर्न फेस्टिवल" गोव्यासह विविध ठिकाणी हद्दपार झाल्यानंतर यावर्षी मुंबईत शिवडी येथे १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. अंमली पदार्थांचे अतीसेवन, युवकांचे मृत्यू यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या “सनबर्न फेस्टिवल"ला मुंबईसह आता नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यातूनही विरोध होत आहे. त्यानुसार वाशी, वसई आणि विरार येथे सनबर्न फेस्टिवल" तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या वतीने आंदोलने करण्यात आली. यावेळी आंदोलनात युवक आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधीनी सहभाग घेतला. “सनबर्न हटवा - देश वाचवा”, “भारत माता की ज्य”, वंदे मातरम”, छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशा घोषणा यावेळी आंदोलनात देण्यात दिल्या. यावेळी राबविलेल्या स्वाक्षरी मोहीमेत अनेक नागरिकांनी स्वाक्षरी करून आपला विरोध दर्शविला. शासनाचा कर बुडवणाऱ्या आणि तरुण पिढीला नशा करायला उद्युक्त करणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलला प्रशासनाने अनुमती का दिली ? असा प्रश्न या आंदोलनातून उपस्थित करण्यात आला असून सनबर्न फेस्टिव्हल” छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र भूमीतून, तसेच देशातूनच कायमचा हद्दपार करावा, अशी मागणी “नशा विरोधी संघर्ष अभियाना"ने केली आहे.
Most Popular News of this Week
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
११ जणांच्या मृत्यूनंतर...
कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...
नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...
| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...
खारघरमध्ये डेब्रीज खाली...
खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...
