Breaking News

ऐरोलीतील डॉ.आंबेडकर ज्ञान स्मारकास सहा हजारांहून अधिक नागरिकांची भेट

ऐरोलीतील डॉ.आंबेडकर ज्ञान स्मारकास सहा हजारांहून अधिक नागरिकांची भेट


नवी मुंबई (प्रतिनिधी) - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त शनिवारी नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकास सहा हजारांहून अधिक नागरिकांनी भेट देत, बाबासाहेबांच्या प्रेरणादायी स्मृतींना विनम्र अभिवादन केले.  नवी मुंबई महापालिकेने उभारलेल्या ऐरोली येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाची प्रशंसा देशापरदेशातील अनेक मान्यवरांनी व नागरिकांनी मुक्तकंठाने केलेली आहे. दि.५ डिसेंबर २०२१ रोजी महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला येथील सुविधांचे लोकार्पण झाल्यापासून ४ वर्षात ४.५ लाखाहून अधिक नागरिकांनी तेथील रजिस्टरमध्ये नोंद करून भेट देत, या ज्ञानस्मारकाचे वेगळेपण अधोरेखित केले आहे व ही संख्या सातत्याने वाढत आहे.

काल महापरिनिर्वाण दिनानिमित्त पहाटेपासूनच नागरिकांनी स्मारकाला भेट देण्यास सुरूवात केली. सायं. ५ वाजे पर्यंत ६ हजारांहून अधिक नागरिकांनी येथे भेट देत बाबासाहेबांना अभिवादन केले. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनीही ज्ञानस्मारकाला भेट देऊन विनम्र अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच देशाच्या विविध राज्यांतून व परदेशातूनही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर जनसागर ओसंडून वाहत असतो. या नागरिकांना नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली,येथील ज्ञानस्मारक म्हणून नावाजल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची माहिती मिळावी व चैत्यभूमीवर येणाऱ्या नागरिकांनी ऐरोली येथील ज्ञानस्मारकाला आवर्जून भेट द्यावी याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली चैत्यभूमीवर ज्ञानस्मारकाची माहिती प्रसारित करणारा स्टॉल प्रदर्शित करण्यात आला आहे. काल रात्रीपासूनच या स्टॉलला भेट देण्यास नागरिकांनी सुरुवात केली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत २० हजाराहून अधिक नागरिकांनी ज्ञानस्मारकाची माहिती जाणून घेतली. यामधील अनेक नागरिकांनी बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या ज्ञानस्मारकाला आवर्जून भेट दिली. स्मारकातील विविध सुविधा दालनांना भेट दिल्यानंतर या स्मारकाचे ज्ञानस्मारक हे नाव अत्यंत योग्य असल्याचे अभिप्राय बहुसंख्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले.

या ज्ञानस्मारकामधील बाबासाहेबांचे जीवनचरित्र दूर्मीळ छायाचित्रांतून साकारणारे विशेष छायाचित्र दालन पाहताना नागरिक भारावून गेले. येथील ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई-लायब्ररीसह ५ हजाराहून अधिक पुस्तकांनी समृध्द ग्रंथालयातून माहिती व ज्ञानाचा खजिनाच उपलब्ध असल्याची प्रतिक्रिया मिळाल्या. याठिकाणी मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार या विषयावरील पदव्यत्तुर पदविका (पीजी डिप्लोमा) अभ्यासक्रम सुरू असून त्यामध्ये प्रवेश घेण्याबद्दल सकारात्मकता दर्शवित अनेक नागरिकांनी त्याची माहिती घेतली.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...