Breaking News

मनोज जरांगे पाटील रविवारी खांदावसाहतीत

मनोज जरांगे पाटील रविवारी खांदावसाहतीत

पनवेल (वार्ताहर) - मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे रविवार दि. ७ डिसेंबर रोजी पनवेलच्या ऐतिहासिक भूमीत दाखल होणार आहेत. सकल मराठा समाज मंडळ खांदा वसाहत येथे रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मराठा भवन उद्‌घाटन व मराठा कृतज्ञता मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानिमित्त मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील येणार असून या कार्यक्रमासाठी पनवेल मधील सर्व समाज बांधवानी आवर्जून उपस्थित राहावे व समाज कर्तव्य बजवावे अशी आग्रहाची विनंती संतोष जाधव यांनी केली आहे.


Most Popular News of this Week