Breaking News

नगरपरिषद नगरपंचायत निकाल लांबणीवर !

नगरपरिषद नगरपंचायत निकाल लांबणीवर !

आज होणारी मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई - नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, आज दि. ३ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार होता. मात्र नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लांबणीवर पडला आहे. सर्व निवडणुकांचा एकत्रित निकाल आता २१ डिसेंबरला लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

निवणुकीदरम्यान २४ नगरपालिका आणि १५४ सदस्यांच्या निवडणीसाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे. कायदेशीर पेच निर्माण झाल्याने निवडणूक आयोगाने या प्रभागांमधील निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली होती. मात्र आज होणारी मतमोजणी एकत्रित २१ डिसेंबर रोजी घेतली जाऊ शकते का? अशी विचारणा हायकोर्टाच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाकडे केली होती. यावर हा निकाल आला आहे. कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर तो मान्यच करावा लागेल. पण कोर्टात गेल्या काही काळात ही जी पद्धती वापरली जात आहे ते योग्य वाटत नाही. निवडणूक आयोगाने यात सुधार आणला पाहिजे. त्यांना अनेक निवडणुका घ्यायच्या आहेत. जो काही कायदा आहे त्याचे चुकीचे इंटरप्रिटेशन करण्यात आले, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

ज्या लोकांनी कोर्टात धाव घेतली, त्या ठिकाणी त्यानाही दिलासा दिला नाही. हे खूप चुकीचे आहे. मी कालही माझी नाराजी दर्शवली आहे. सगळी प्रक्रिया कायदेशीर होत नाही यावर मी नाराज आहे. सगळी मतमोजणी थांबवणे योग्य नाही. लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. आपण कसे वागतो काय संकेत देतो यांचा विचार केला पाहिजे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...