Breaking News

मौजे बेलोंडाखार येथील लॉजिस्टीक पार्कमधील अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई

मौजे बेलोंडाखार येथील लॉजिस्टीक पार्कमधील अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई

नवी मुंबई (प्रतिनिधी)- सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागाने शहरातील अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यानुसार काल सिडकोच्या अनधिकृत बांधकामे (न.मुं) विभागामार्फत रोजी नोड लॉजिस्टिक पार्क मौजे बेलोंडाखार. सर्वे नंबर ५९/४,५ व ६ येथे निष्कासन मोहिम राबवून सिडको अधिसूचित, संपादित जागेवरील अंदाजे क्षेत्रफळ ६०००.०० चौ. मी. जागेवरील विट बांधकाम, संरक्षण भिंत, बांधकामाचे जोते, प्रवेशद्रार, सिक्युरीटी केबिन पत्रा फेन्स इ. स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने तोडले. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहे. नमूद अतिक्रमण सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन व सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आले असल्यामुळे निष्कासित करण्यात आले असल्याची माहिती सिडकोने दिली. सदरची कारवाईची ही मोहीम सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार व मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी व सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे राबविण्यात आली. या कारवाईसाठी १० लेबर, १ जेसीबी, १ पोकलेन, १ ट्रक, १ जीप असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता.


Most Popular News of this Week

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...