केडीएमसी आयुक्तांनी केली २७ गावातील अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामांची पाहणी: कामे वेगाने पूर्ण करण्याचे दिले निर्देश
केडीएमसी आयुक्तांनी केली २७ गावातील अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामांची पाहणी: कामे वेगाने पूर्ण करण्याचे दिले निर्देश
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सन 2015 मध्ये, नव्याने समाविष्ट झालेल्या 27 गावांसाठी केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली होती. सन 2015 मध्ये जेव्हा ही गावे समाविष्ट झाली तेव्हा त्या गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी उंच जलकुंभ, बुस्टर टाक्या ,संप व पंप हाऊस उपलब्ध नसल्याने या गावांना पाणीपुरवठा होण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. या गावांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे गुरुत्व वाहिनी द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये 27 गावांना पुरेसा पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने सदरच्या योजनेचे काम पूर्ण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे ही बाब आयुक्त अभिनव गोयल यांच्या निदर्शनास आली त्यामुळे या योजनेस गती देऊन सदरची योजना मार्च 26 अखेर अस्तित्वातील वितरण वाहिन्यांच्या साह्याने पूर्ण करण्यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रत्यक्ष विविध ठिकाणी चाललेल्या कामावर भेट देऊन आत्तापर्यंत झालेल्या कामाची पहाणी केली. यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, अमृतचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता बांधकाम मनोज सांगळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
तसेच प्रत्येक ठिकाणी जी कामे शिल्लक आहेत ती वेगाने पूर्ण करण्याचे ठेकेदारास निर्देश दिले. कोणत्याही परिस्थितीत या योजनेतील आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरची कामे विहित मुदतीत पूर्ण करून योजना मार्च 26 अखेर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक पाईपलाईन, आवश्यक कामगार वर्ग उपलब्ध करून देण्याचे ठेकेदारास व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने, पीएमसी या नात्याने सदर योजना महापालिकेला ठरवलेल्या विविध मुदतीत पूर्ण करून हस्तांतरित करण्याचे तसेच प्रत्येक महिन्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. ही योजना पूर्ण झाल्यावर 27 गावाच्या पाणीपुरवठ्यामध्ये निश्चितपणे सुधारणा होणार असल्याचे आयुक्त अभिनय गोयल यांनी सांगितले.
Most Popular News of this Week
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
