Breaking News

313 निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

313 निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

कल्याण : नर सेवा,नारायण पूजा या निरंकारी मिशनच्या शिकवणीचा प्रत्यय प्रत्यक्ष कृतीतून घडवत संत निरंकारी सत्संग भवननारिंगी विरार येथे रविवारी आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये सुमारे 313 भक्तगणांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. आपल्या सामाजिक व मानवतावादी सेवांची परंपरा निरंतर जपत याआधी देखील संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात मुंबई व उपनगरात विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

      या शिबिरातील रक्त संकलनाचे कार्य नायर हॉस्पिटल रक्तपेढी, संत निरंकारी रक्तपेढी व सर जे.जे. हॉस्पिटल रक्तपेढी यांच्यामार्फत संयुक्तरित्या करण्यात आले. यातील नायर हॉस्पिटल रक्तपेढी मार्फत 101, संत निरंकारी रक्तपेढी मार्फत 121 व सर जे.जे.हॉस्पिटल रक्तपेढी मार्फत 91 युनिट रक्त संकलन करण्यात आले.

       या भव्य रक्तदान शिबिराचा शुभारंभ मंडळाचे नाशिक क्षेत्राचे झोनल इन्चार्ज जनार्दन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निरंकार प्रभूच्या नामस्मरणाने करण्यात आला. याप्रसंगी निरंकारी मिशनच्या भक्तगणांची व सेवादल स्वयंसेवकांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या शिबिराला उपस्थिती दर्शवली आणि निरंकारी मिशन समर्पित भावनेने करत असलेल्या मानवतावादी कार्याचे मनःपूर्वक कौतुक देखील केले. यात प्रामुख्याने वसई-विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील यांचा समावेश होता. मंडळाचे स्थानिक ब्रँचचे प्रबंधक, सेवादल अधिकारी तसेच सर्व सेवादल स्वयंसेवक यांच्या एकत्रित प्रयत्नाने सदर रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले.


Most Popular News of this Week

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...