राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर
महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर,
निवडणूक आयोगाकडून सूचना व हरकतींना मुदतवाढ
नवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून आता जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचे वेध सर्वांनाच लागले असल्याने राजकीय पक्ष देखील कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने यापूर्वी प्रारुप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, या मतदार याद्यांमध्ये अद्यापही घोळ आणि दुबार मतदारांची संख्या मोठी असल्याने आता नव्याने मतदार प्रारुप याद्या तयार करण्यात येणार आहेत. यासंदर्भात मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत सचिव सुरेश कांकांणी यांच्याकडून जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, यापूर्वी अंतिम मतदार यादीसाठी दि. ५ डिसेंबर ही तारीख होती, त्यास आता मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख आता 3 डिसेंबर २०२५ असणार आहे. प्रारूप मतदार यादीवरील दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आधी प्रमाणित करून प्रसिद्ध करण्याचा दि. १० डिसेंबर २०२५ असेल. मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे १५ डिसेंबर आणि मतदान केंद्रानिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे २२ डिसेंबर २०२५ असणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी आधी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख ६ नोव्हेंबर २०२५ ठरली होती. त्यानंतर, ती पुढे ढकलत २०नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने यादी प्रसिद्ध केली. मात्र, या यादीत घोळ असल्याने हरकती घेत निवडणूक आयोगाकडे नव्याने प्रारूप यादी तयार करण्यासाठी महापालिकेने वेळ मागितला होता. त्यानुसार, नवीन सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने यादी प्रसिद्ध केली. मात्र, या यादीत घोळ असल्याने हरकती घेत निवडणूक आयोगाकडे नव्याने प्रारुप यादी तयार करण्यासाठी महापालिकेने वेळ मागितला होता. त्यानुसार, नवीन सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Most Popular News of this Week
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
