Breaking News

''वाशीतील फेरीवाले महापालिकेच्या रडारवर, कारवाईमुळे मिनी सी-शोर फेरीवाला मुक्त

''वाशीतील फेरीवाले महापालिकेच्या रडारवर, कारवाईमुळे मिनी सी-शोर फेरीवाला मुक्त

वाशी (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार शहरातील बेकायदा बांधकामांसह फेरीवाल्यांवर कारवाईची मोहिम महापालिकेने तीव्र केली असून काल वाशी से-४ येथील प्रसिध्द व नागरिकांच्या वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या मिनी सी-शोर या परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई करून हा परिसर फेरीवाला मुक्त केला आहे.

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त (२) डॉ.राहुल गेठे व उपायुक्त (अतिक्रमण) डॉ.कैलास गायकवाड यांच्या निर्देशानुसार वाशीविभाग कार्यालयाचे विभाग अधिकारी सुखदेव एडवे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकाने फेरीवाला मुक्त करण्यासाठी मागील काही दिवसांपासून धडक मोहिम सुरु केली आहे. वाशी से-४ येथील प्रसिध्द मिनी सी-शोर हे ठिकाण संपूर्ण नवी मुंबईकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.शहरा बरोबरच बाहेरील नागरिक देखील दैनंदिन सकाळ आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येतात. मुंबई व आजूबाजूच्या शहरातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक तेथे संध्याकाळचा आनंद घेण्याकरीता येणाऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, याच गर्दीचा फायदा घेत अनेक फेरीवाल्यांनी पदपथासह मोकळया जागांवर आपले बस्थान मांडले होते. त्यामुळे ये- जा करणाऱ्या नागरिकांना आणि बाहेरील पर्यटकांना चालणे कठीण होत होते.अनेकदा कारवाई करताना एक ते दोन फेरीवाले हाती लागत होते.

नागरिकांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारीची दखल घेत, वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी सर्व बाजूने येऊन सर्वच्या सर्व फेरीवाल्यांना हेरुन त्यांच्यावर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत, भेळपुरी, पाणीपुरी, सँडविच, इतर फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्यात आली. वाशी विभागात नागरिकांना त्रास होईल असे आणि विनापरवाना कोणतेही फेरीवाले निदर्शनास आल्यास त्यांच्यावर अतिक्रमण पथकाकडून कारवाई सुरुच ठेवण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त येडवे यांनी सांगितले.


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

महापालिकेला फसविणाऱ्या...

अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...